आपल्या धार्मिक , सामाजिक व राजकीय आयुष्याचा पाया बुद्धिवाद हाच असला पाहिजे.
आपल्या धार्मिक ,
सामाजिक व राजकीय आयुष्याचा पाया बुद्धिवाद हाच असला पाहिजे
तारीख २४ सप्टेंबर १ ९ ४४ रोजी सकाळी १० वाजता मद्रास येथे प्रभात टॉकीजमध्ये रैशनल सोसायटीच्या विद्यमाने , श्री . एस . रामनाथ यांच्या अध्यक्षतेखाली डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले . ते आपल्या भाषणात म्हणाले , अध्यक्ष महाराज , बंधु आणि भगिनींनो , मी नुसता राजकारणी असल्यामुळे वाङ्मय , इतिहास व तत्त्वज्ञान यावर अधिकाराने बोलू शकत नाही . पण मी वाङ्मय , इतिहास व तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून जे मत बनविले , ते आज तुम्हाला सांगणार आहे . हिंदुस्थानच्या इतिहासासंबंधी पुष्कळ गैरसमज रूढ आहेत . पुष्कळ विद्वान इतिहासकारांनी म्हटले आहे की , हिंदुस्थानात राजकारणाचा काही गंधच नव्हता . प्राचीन भारतीयांनी केवळ तत्त्वज्ञान , धर्म व अध्यात्म याविषयी लिहिण्याकडेच लक्ष दिले होते व ते इतिहासापासून , राजकारणापासून साफ अलिप्त होते . असेही म्हणतात की हिंदी जीवन व समाज एका ठराविक पोलादी चौकटीमध्येच फिरत आहेत व त्या चौकटीचे वर्णन केले की इतिहासकाराचे काम संपले ! हिंदुस्थानचा प्राचीन काळचा इतिहास अभ्यासल्यानंतर माझे मत मात्र ह्या विद्वानांहून अगदी निराळे बनले आहे . ह्या अभ्यासात मला आढळून आले आहे की , जगात कुठल्याही देशात हिंदुस्थानसारखे प्रचंड गतिमान राजकारण नव्हते आणि हिंदुस्थान हा बहुधा एकच देश असा आहे की जेथे जगात दुसरीकडे कोठेही दिसली नाही अशी क्रांती घडून आली होती . हिंदी इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी एक मूलभूत गोष्ट - ज्याचा इतिहासकारांना साफ विसर पडलेला दिसतो- नेहमी ध्यानात घेतली पाहिजे , ती म्हणजे प्राचीन हिंदुस्थानात घडलेला बौद्ध व ब्राह्मण यामधील लढा . याचा इतिहास काही प्रोफेसरांनी म्हटल्याप्रमाणे हा केवळ एखादा पंथामधला मामुली लढा नव्हता . सत्य म्हणजे काय यासाठी तो लढा होता . बुद्धाने सत्याची व्याख्या अगदी सोप्या शब्दात सांगितली होती . इंद्रियांना कळू शकेल तेच सत्य होय . दुसऱ्या भाषेत सांगावयाचे म्हणजे कुणी अधिकारी व्यक्तीने सांगितलेली वस्तूच सत्य , असे नाही . उलट ब्राह्मणांचे म्हणणे असे की , जे वेदाप्रमाणे आहे तेच सत्य ( हास्य ) . बौद्ध क्रांतिकारक होते आणि ब्राह्मण प्रतिगामी सध्या आपण प्रतिगामी लोकांच्या वर्चस्वाखाली आहोत . वेद वाचल्यानंतर मला मोठे आश्चर्यच वाटले अशा ह्या पुस्तकानाच प्रमाणग्रंथ मानण्याचा आग्रह ब्राह्मणासारखे हुशार लोक का धरतात ?, त्यात विदूषकी बडबडीखेरीज दुसरे काही नाही . ( प्रचंड हास्य व टाळ्या ) अथर्ववेदात तर निव्वळ ' जादुई मंत्र ' आहेत ! ( हास्य व टाळ्या ) जर इस्लाम धर्मानी ह्या देशात पाऊल टाकले नसते तर आणखी फार काळ हा ब्राह्मण - बौद्धातला लढा चालला असता . जगाच्या इतिहासात स्वातंत्र्य , समता व बंधुत्वाचा आदेश देणारा बुद्ध हाच पहिला मनुष्य निघेल . तो आदेश नष्ट झाला कारण क्रांतीविरूद्ध प्रतिक्रांतीने विजय मिळविला . आहे . त्याचीच आज हिंदू समाजाला सर्वात जास्त जरूरी आहे . तो आदेश नष्ट झाला पुष्कळ लोकांना भगवद्गीता हा फार मोठा धार्मिक ग्रंथ वाटतो . मोठ्या खेदाने मला म्हणावे लागते की तसे वाटण्यासारखे मला तरी त्या पुस्तकात काही आढळले नाही . याउलट त्या ग्रंथाने बराच अनर्थ केला आहे . ज्या बुद्धीच्या कसोटीला उतरू शकणार नाहीत , अशा गोष्टींना तात्त्विक आधार देण्याचा प्रयत्न त्यात केला आहे . शेवटी राजकारण , समाज , राज्य शासन , धर्म व बुद्धिवादात ज्या क्रांतीची बुद्धाने मुहूर्तमेढ रोवली ती पुढे निष्फळ ठरली . धर्म व राजकारण यांना एकत्र जुंपून , सिद्ध करण्यासाठी मनुस्मृती लिहिण्यात आली . चातुर्वर्ण्य ही केवळ सामाजिक प्रथा नाही , ते एक राजकीय तत्त्वज्ञान आहे , असे आपल्या सामाजिक व राजकीय आयुष्याचा पाया बुद्धिवाद हाच असला पाहिजे . प्रत्येक देशात राजकीय पुढाऱ्याची कसोटी पाहिली जाते . पण गांधींकडे पाहा . त्यांना तशी कसोटीच कुणी लावत नाही . ते म्हणतील ते खरे . दोन वर्षापूर्वी गांधी म्हणाले पाकिस्तान हे पाप आहे . सर्व काँग्रेसवाल्यांनी त्यांची री ओढली . आज गांधी म्हणतात , पाकिस्तान पाप नाही , मुसलमान मागतील तर ते दिले पाहिजे आणि काँग्रेसवाले आता त्याचीही री ओढतात . आपल्या सामाजिक , राजकीय व बौद्धिक जीवनात बुद्धिवादाला कसा फाटा देण्यात येतो याचे हे एक उदाहरण आहे . ह्या परिस्थितीचा जर अत झाला नाही तर देशावर मोठे गंडांतर आल्याशिवाय राहाणार नाही .
संदर्भ : डॉ . बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि
भाषणे खंड - १८ भाग २ पान नं . ४६१ ते ४६३
शब्दांकन
आयु,भास्कर गायकवाड
९८५०२४७६२१
आभार
आयु. डॉ.सुरेश कोरे साहेब
Post a Comment