वेद मानवनिर्मित अथवा ईश्वरनिर्मित नाहीत असे ब्राम्हणांनी घोषित का केले ?

वेद मानवनिर्मित अथवा ईश्वरनिर्मित ............

             


                    वेदप्रामाण्य अथवा वेदांची अचूकता एवढ्यावरच ब्राम्हणांचे समाधान झाले नाही आणखी पुढे जाऊन त्यांनी अशी उपपत्ती मांडली , की वेद हे अपौरुषेय आहेत . याचा अर्थ वेद मानवनिर्मित नाहीत असा होतो . वेदांचा निर्दोषपणा , वेदांचा अधिकार यामुळे आपोआपच मान्य करावा लागतो .ते मानवनिर्मित नसल्यामुळे दोष अथवा उणिवा त्यात असणारच नाहीत या उपपत्तीचा स्वतंत्रपणे विचार करायलाच हवा .

                वेदांचा ' ग्रंथकर्ता ' म्हणून खरोखरीच कोणी नाही काय ? ते खरोखरीच अपौरुषेय आहेत का ? यासाठी उत्तम पुरावा म्हणजे ' अनुक्रमणिका ; ' प्राचिन संस्कृत वाङमयाचा एक महत्वाचा भाग म्हणजे या ' अनुक्रमणिका ' आहेत . अनुक्रमणिका म्हणजे प्राचीन वैदिक वाङमयातील विविध भागांच्या पध्दतशीर अनुक्रमणिकाच आहेत . प्रत्येक वेदाची एक अनुक्रमणिका आहे . काही वेळा एका पेक्षा अधिक अनुक्रमणिका आहेत . ऋग्वेदाच्या सात अनुक्रमणिका सध्या अस्तित्वात आहेत . पाच शौनकाच्या , एक कात्यायनाची आणि एका अनुक्रमणिकेचा कर्ता अज्ञात आहे . यजुर्वेदाच्या तीन अनुक्रमणिका आहेत . तीन शाखांपैकी प्रत्येकीची एक अनुक्रमणिका . साम वेदाच्या दोन अनुक्रमणिका आहेत . एक आर्य ब्राम्हण आणि दुसरी परिशिष्ट म्हणून ओळखली जाते . अथर्ववेदाची एकच अनुक्रमणिका अस्तित्वात आहे . ती बृहत्सर्वानुक्रमणी म्हणून ओळखली जाते .

         वेद हे सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशी आहेत . वर्तमान , भूत , भविष्य , लहान  मोठे , जवळचे दूरचे यांवर प्रकाश टाकण्याचे सामर्थ्य त्यात आहे .  

                      वेदांतमताप्रमाणे दोन निरनिराळ्या उपपत्तींचा पाठपुरावा करता येतो . वेदांचा उगम ब्रह्म हाच आहे असे एक मत . वेद हे शाश्वत आहेत असेही वेदांत मत सांगते . 

                वेद हे मानव निर्मित नाहीत एवढ्याने ब्राम्हणांचे समाधान होत नाही . त्यापुढेही जाऊन ते असे म्हणतात की वेद मानवाने अथवा देवानेही निर्माण केलेले नाहीत . वेद निर्मितीच्या अनोख्या वेगळेपणासाठी अधिक समजून घेतले पाहिजे .

                     पूर्वमीमांसाकार जैमिनी याने या मताचा पाठपुरावा केला आहे . जैमिनीचे हे म्हणणे त्यातील पूर्वमिमांसा या ग्रंथात वेद अपौरुषेय आहेत हे तत्त्व प्रसृत केले आहे . याबाबतीत  विवेचन करतांना प्रथम जैमिनीने नैय्यायिक मताचा परामर्श घेतला आहे . नैयायिकांचे म्हणणे की वेद हे परमेश्वर निर्मित आहेत . मीमांसाकार त्यावर असे म्हणतात-

              परमेश्वराच्या तोंडातून वेदांची निर्मिती झाली हे खरे नाही . कारण परमेश्वराला जिव्हा किंवा वाणीचे इंद्रियच नाही . त्यामुळे त्याला असे शब्दोच्चार करणे शक्यच नव्हते . नैयायिकाचे मताप्रमाणे हा आक्षेप योग्य नाही . कारण परमेश्वर हा निराकार असला , अशरीर असला तरी आपल्या भक्तांसाठी तो साकार होऊ शकतो , शरीर धारण करू शकतो . 

          परमेश्वराने शरीर धारण केले असे मान्य केले तरी एक प्रश्न उरतोच की त्याला त्या इंद्रियाचे शरीर सामर्थ्य जेवढ्या प्रमाणात असेल तेवढ्याच प्रमाणात परमेश्वरालाही त्या इंद्रिय शक्तीतून निर्मिती शक्य आहे. 

             कोणत्याही वस्तुमानाचे ज्ञान डोळा या इंद्रियांच्या सहाय्याने झाले तर ते ज्ञान फक्त दृष्टीपुरतेच मर्यादित रहाते . प्रत्येक इंद्रियाची काही मर्यादा आहे . उदा . कानाने आकार समजू शकणार नाहीत . 

                 अर्थातच वेदांचे अपौरुषेयत्त्व मान्य करताना या गोष्टीचा विचार करावाच लागेल . 

                नैय्यायिक मताला विरोध करण्यासाठी जैमिनीने या मतांचा परामर्श घेतला आहे . 

              मग जैमिनीचे म्हणणे तरी काय आहे ? त्याचे म्हणणे असे की वेद हे केवळ ' देवांचा शब्द ' या स्वरूपाचे नाहीत तर त्याहून काही विशेष आहेत . 

             प्रो . मॅक्समुल्लर यांच्या मते सर्वात परिपूर्ण अनुक्रमणी म्हणजे कात्यायनकृत ऋग्वेदाची सर्वानुक्रमणी . तिचे महत्त्व असे-

 १ ) प्रत्येक श्लोकाचा पहिला शब्द 

२ ) ओळींची ( ऋचांची संख्या )

३ ) रचनाकार ऋषींचे नाव आणि गोत्र 

४ ) देवतांची नावे 

५ ) छंद अथवा वृत्त ..... या सर्व गोष्टी या अनुक्रमणीत दिलेल्या आहेत . यातील संदर्भावरून असा निष्कर्ष निघतो की ऋग्वेदांचे रचनाकार ऋषीच होते . अर्थातच ऋग्वेद हे मानवनिर्मित आहेत . इतर वेदांबाबतही असेच म्हणता येईल . अनुक्रमणींच्या सत्यतेबाबत विश्वासार्हतेबाबत अनेक पुरावे ऋग्वेदात आहेत .. ऋषींनी स्वतःःच रचनाकार असल्याबद्दल त्यांत म्हटलेले आहे . 

               अनुक्रमणींच्या पुराव्याशिवाय ' वेद हे अषौरुषेय नाहीत ' या मताचा पाठपुरावा करणारे आणखी काही पुरावे आहेत . ऋषींनी स्वतःच वेदांना मानवनिर्मित आणि ऐतिहासिक मानले आहे . ऋग्वेदातील ऋचात प्राचीन आणि आधुनिक ऋषींमधील ..भेद स्पष्ट केला आहे . 

                 ऋग्वेदाचा अधिक तपशीलवार अभ्यास केला तर असं दिसून येते की ऋषींनी स्वतः नव्या रचना व जुन्या रचना ( स्तोत्र व ऋचा ) यात भेद केला आहे . हे भेद काय दर्शवितात ? वेद हे मानवनिर्मित आहेत हेच दर्शवितात . असे असूनही ब्राह्मणांनी वेद हे अपौरुषेय आहेत असा प्रचार का केला ? यामागे बाह्मणांचा कोणता उद्देश असावा हाच एक कूटप्रश्न आहे .

             एक गोष्ट सत्य आहे की काही विख्यात तत्वज्ञांना वेद है सनातन किंवा अपौरुषेय आहेत हे मान्य नसले तरी त्यांना वेदांचा अधिकार मान्य होता .

               प्रख्यात तत्त्वज्ञ न्यायशास्त्रकार गौतम म्हणतात “ वेदांचा अधिकार  , सूत्रांप्रमाणेच , वेद ज्यांच्यापासून निर्माण झाले त्या सक्षम व्यक्तींमुळेच , ऋषींमुळेच आहे . ( याचाच अर्थ असा की वेद हे मानवनिर्मित आहेत . )

              वैषाशिक ( वैशेषिक ) पद्धती असे मानते की वेद हेच प्रमाण होत . पण या " विचाराची जी कारणे आहेत ती अशी 

१ ) वेद ही बुद्धिमान मनाची निर्मिती आहे . 

२ ) वेद हे देवांचे उदगार आहेत म्हणून ते प्रमाण आहेत .

                               वेद हे अपौरुषेय आहेत , वेद मानवनिर्मित नाहीत. हे सिद्ध करण्यासाठी ब्राम्हणांनी असा निराशाजनक प्रयत्न का करावा ? ब्राम्हणांना यातू काय मिळवायचे होते ?ब्राम्हणांना श्रेष्ठत्व बहाल करणाऱ्या चातुर्वर्ण्याचा पुरस्कार वेदांनी केला म्हणूनच ब्राम्हणांनी वेदांचे अपौरुषेयत्व  सिद्ध करण्याचा खटाटोप केला.



संदर्भ -  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  लिखित

  RIDDLES IN HINDUISM  ( हिंदुत्वातील कुट प्रश्न )

      अनुवाद - लेखक डॉक्टर न. म. जोशी


आयु.भास्कर गायकवाड..................




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.